प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2023

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2023

 

भंडारा, दि. 4 : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2016 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2023 आहे.

 

सन 2023-24 पासून सर्वसमावेशक पिक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याठी शेतकऱ्यांना प्रती अर्ज केवळ 1 रुपया भरुन पिक विमा पोर्टलवर नोंदणी करायची आहे. खरीप हंगाम 2023 करीता जिल्हयात चोलामंडलम एम.एस.जनरल इंन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनी कडून राबविण्यात येणार आहे. या विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक 18002089200 आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संगिता माने यांनी कळविले आहे.