माजी  सैनिकांनी सैनिक मेळाव्यात सहभागी व्हावे

माजी  सैनिकांनी सैनिक मेळाव्यात सहभागी व्हावे

      भंडारा, दि. 11 :  15 ऑक्टोबरला नागपूर येथे भ माजी सैनिक मेळावा “कविर्वय सुरेश भट सभागृह” रेशिम बागेत  आयोजीत केलेला आहे. या माजी सैनिक मेळाव्या मध्ये जिल्हयातील वीरनारी, वीरमाता,  विरपिता, माजी सैनिक/विधवा व त्यांचे अवलंबित यांना सहर्ष आमंत्रीत करण्यात येत आहे. ईच्छुक वीरनारी, माजी सैनिक/विधवा यांनी कार्यक्रमामध्ये नोंदनी करण्याकरीता नोंदनी अर्ज या कार्यामध्ये उपलब्ध आहे.

       कार्यक्रमाचे ठळक वैशीष्टे  मेळाव्या मध्ये माजी सैनिक/ विधवा यांच्या अडीअडचणी सोडविणाऱ्या करीता स्वतंत्र स्टाल, मेडिकल आणि डेंटल स्टॉल, रेकार्ड ऑफिस  स्टॉल ECHS स्टाल, ग्रोसरी आणि Liquor स्टाल, आर्मि  रिक्रुटिंग स्टॉल आणि आर्मि  प्लेसमेंट  स्टॉल ईत्यांदी सुविधा उपलब्ध आहेत.

          नागपूर बस स्थानक, नागपूर मुख्य आणि कामठी रेल्वे स्टेशन ते मेळावा स्थळा पर्यंत ये-जा करण्याकरीता बसेसची सुविधा पुरविण्यात येईल. शिवाय कार्यक्रमाला उपस्थित यांना चहा व जेवनाची व्यवस्था करण्यात आली आहे. करीता जिल्हयातील जास्तीत जास्त माजी सैनिक/विधवा ,अवलंबीत यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.आकाश अवतारे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, भंडारा यांनी केले आहे.