चंद्रपुर शहरातील पाणी पुरवठा योजना चालविण्याकरीता निविदा प्रक्रीया बाबत

चंद्रपुर शहरातील पाणी पुरवठा योजना चालविण्याकरीता निविदा प्रक्रीया बाबत

चंद्रपुर शहर पाणी पुरवठा योजना चालविण्याकरीता महानगरपालिकेमध्ये आवश्यक मनुष्यबळ नसल्यामुळे बरीचशी कामे हि कंत्राटी पध्दतीने करावी लागतात..

त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत चालविण्याकरीता मनुष्यबळ पुरवठा, पाईपलाईन वरील गळत्या दुरुस्त्या, पंपींग मशिनरी इत्यादीचे देखभाल दुरुस्ती करीता कंत्राटी पध्दतीने कामे विविध कंत्राटदाराकडुन करुन घेण्यात येतात.

वृत्तपत्रामध्ये एकाच कामासाठी ३ कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येत असल्याबाबतचे वृत्तपत्रात

प्रकाशीत झाले आहे. त्या अनुषंगाने खुलासा करण्यात येत आहे.

चंद्रपूर शहर पाणी पुरवठा योजनेचे खाजगीकरण रद्द करुन नोव्हेम्बर २०१९ मध्ये महानगरपालिकेने योजना स्वतःचे ताब्यात घेतली. योजना ताब्यात घेतल्यानंतर ईरई धरण, ईरई नदी हेडवर्क्स, रामनगर जलशुध्दीकरण केंद्र, तुकुम जलशुध्दीकरण केंद्र व बाबुपेठ संपवेल इत्यादी तसेच व्हॉल्वमन व्दारे योजना संचालीत करण्याकरीता आवश्यक मनुष्यबळ पुरवठा करीता एक व विद्युत, यांत्रिकी व स्थापत्य कामाकरीता वेगळी अश्या दोन वेगवेगळ्या निविदा मागविण्यात आलेल्या होत्या. मनुष्यबळाकरीता दि. ०९/११/२०१९ रोजी प्रथम कंत्राट देण्यात आले त्यानंतर दुसऱ्यांदा दि. २६/११/२०२१ ला सुध्दा त्याच पध्दतीने कंत्राट देण्यात आले. ज्यामध्ये ईरई धरण, ईरई नदी हेडवर्क्स, रामनगर जलशुध्दीकरण केंद्र, तुकुम जलशुध्दीकरण केंद्र व बाबुपेठ संपवेल या ठिकाणावरील पम्प मशिनरी चालविणे मनुश्यबळ पुरवठा कामांचा समावेश होता. तसेच पम्प मशिनरी दुरुस्ती, पाईपलाईन गळत्या दुरुस्ती या कामाकरीता स्वतंत्र प्रथम दि. ०९/०६/२०२० ला निविदा मागवुन कंत्राट निश्चित करण्यात आले. ज्यामध्ये विद्युत, यांत्रिकी व स्थापत्य कामांचे देखभाल व दुरुस्तीचा समावेश होता. सदर कंत्राटाची मुदत संपल्यानंतर पुन्हा निविदा प्रक्रीया करुन दि. १५/११/२०२१ ला दुसऱ्यांदा कंत्राट निश्चित करण्यात आले. त्यामुळे या अगोदर सुध्दा कामनिहाय वेगवेगळ्या निविदा मागविण्यात येत होत्या.

ईरई धरण, ईरई नदी हेडवर्क्स, रामनगर जलशुध्दीकरण केंद्र, तुकुम जलशुध्दीकरण केंद्र व बाबुपेठ संपवेल येथील पम्प व मशिनरी चालविण्याकरीता मनुष्यवळाचा पुरवठा करुन योजना चालविण्यात येत आहे. परंतु ईतर शहरात सदर कामे सेवा पध्दतीने करण्यात येत असल्याने त्याच पध्दतीने चंद्रपूर शहर पाणी पुरवठा योजनेतील ईरई धरण, ईरई नदी हेडवर्क्स, रामनगर जलशुध्दीकरण केंद्र, तुकुम जलशुध्दीकरण केंद्र व बाबुपेठ संपवेल कंत्राटी पद्धतीने चालविण्याकरीता निविदा मागविण्यात आलेली आहेत. सदर कामाचे निविदा अटी व शर्ती नुसार ईरई धरण, ईरई नदी हेडवर्क्स, रामनगर जलशुध्दीकरण केंद्र, तुकुम जलशुध्दीकरण केंद्र व बाबुपेठ संपवेल येथील पम्प मशीनरी चालविणे अपेक्षीत आहे. सदर कामामध्ये पम्प मशिनरीमध्ये बिघाड झाल्यास दुरुस्ती करण्याचा समावेश केलेला नाही.

वृत्तपत्रामध्ये प्रकाशित वृत्तानुसार एकाच कामासाठी एकाच वेळी ३ कंत्राटदाराची नियुक्त करण्याचा घाट घातला हे वृत्त चुकीचे असुन तीनही निविदा या वेगवेगळ्या आहेत. एक निविदा ही ईरई धरण, ईरई नदी हेडवर्क्स, रामनगर जलशुध्दीकरण केंद्र, तुकुम जलशुध्दीकरण केंद्र व बाबुपेठ संपवेल येथील पम्प चालविणे ज्यामध्ये पम्पामध्ये काही बिघाड झाल्यास दुरुस्ती करण्याच्या कामाचा समावेश नाही. त्यामुळे विद्युत व यांत्रिकी कामाकरीता एक व स्थापत्य कामे ज्यामध्ये पाईपलाईन मधील गळत्या दुरुस्ती, व्हॉल दुरुस्ती इत्यादी स्थापत्य कामाचा समावेश असलेली दुसरी निविदा मागविण्यात आलेली आहे.

तरी एकाच कामासाठी एकाच वेळी ३ कंत्राटदाराची नियुक्त करण्याचा घाट घातला हे वृत्त चुकीचे

असुन याबाबत खुलासा देण्यात येत आहे.