29 जूनला बकरी ईद सुट्टीनिमित्त पक्की व शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी 28 जून रोजी होणार

29 जूनला बकरी ईद सुट्टीनिमित्त पक्की व शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी 28 जून रोजी होणार

 

चंद्रपूर, दि.27: शासनाने सन 2023 करीता जाहीर करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्ट्यामधील बकरी ईदची सार्वजनिक सुट्टी बुधवार, दि. 28 जून 2023 रोजी दर्शविण्यात आली होती. शासनपत्रान्वये, सदर सुट्टी दि. 29 जून 2023 रोजी जाहीर झाल्यामुळे ज्या अर्जदारांनी 29 जून रोजी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेतली आहे, त्यांची पक्की व शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी एक दिवस अगोदर म्हणजे 28 जून रोजी घेण्यात येईल.

 

याबाबत ऑनलाईन मेसेज प्रणालीवरून अर्जदाराच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एस.एम.एसद्वारे कळविण्यात आले आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविलेआहे.