जिल्हा रुग्णालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न

जिल्हा रुग्णालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न

 

भंडारा दि.23: राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष विभाग, जिल्हा रुग्णालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. शिबीरामध्ये योगाचे महत्व व योगासनाचे शरीरावर होणारे परिणाम सांगण्यात आले. यावेळी शिबीरात एकुण 70 लाभार्थी उपस्थित होते.

 

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपचंद सोयाम, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अतुल टेंभुर्णे, योग व निसर्गोपचार तज्ञ माधुरी ठोंबरे (निर्वाण) यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी नर्सिंग स्कुल येथील विद्यार्थीनी, अधिकारी/कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

सर्वांनी आपल्या रोजच्या दैनंदिन जिवनात योगाचा समावेश केल्यास निरोगी जिवण जगण्यास मदत होईल त्याकरिता जिल्हा रुग्णालय येथे दररोज सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत योग व निसर्गोपचार तज्ञ उपलब्ध आहे. त्यांच्या सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. डॉ. दिपचंद सोयाम यांनी यावेळी केले.