अनुसूचित जमातीकरिता शेतात विहीर निमिर्ती व सोलारपंप योजना

अनुसूचित जमातीकरिता शेतात विहीर निमिर्ती व सोलारपंप योजना

 

भंडारा दि.23: विशेष केंद्रीय सहाय्य योजना अंतर्गत जिल्हयातील अनुसुचित जमातीच्या वनहक्क कायदा 2006 अंतर्गत वनपट्टे प्राप्त असणाऱ्या अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना शेतीला पाणी पुरवठा करण्याकरीता विहीरींची निमिर्ती करणे, वनपट्टे धारकांच्या शेतीत सोलारपंप बसवुन त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीकोनातुन योजना मंजूर झाली आहे.

इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज प्राप्त करण्याकरिता व भरलेले अर्ज सादर करण्याकरिता कार्यालयीन वेळेत 30 जुन 2023 पर्यंत खाली दिलेल्या कागदपत्रासह एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प निरज मोरे यांनी केले आहे.

अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्र

1. लाभार्थी अनुसुचित जमातीचा असावा/ सक्षम अधिकाऱ्याचे जात प्रमाणपत्र

2. रहिवासी दाखला

3. वनहक्क कायदाद्वारे वनपट्टा प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र

4. राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक प्रथम पानाची सत्यप्रत

5. 7/12 दाखला, 8-अ चा उतारा

6. उत्पन्न दाखला, तहसीलदार यांनी दिलेला.

7. विहीर प्रस्तावित असलेल्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असल्याचे भुजल सर्व्हेक्षण यंत्रणेचे प्रमाणपत्र

8. किमान जमीन क्षेत्र

9. या योजनेचा लाभ यापुर्वी आदिवासी विकास विभाग अथवा इतर कोणत्याही शासकिय विभागाकडुन घेतला नसल्याबाबत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. तरी या योजनेकरिता ईच्छुकांनी कार्यालयात संपर्क साधावा.