डॉ. भालचंद्र स्मृतीदिन जिल्हा रुग्णालय येथे संपन्न

डॉ. भालचंद्र स्मृतीदिन जिल्हा रुग्णालय येथे संपन्न

 

भंडारा दि.23: डॉ. भालचंद्र स्मृतीदिन सप्ताहाचा समारोप आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दीपचंद सोयाम यांच्या हस्ते नेत्र विभाग जिल्हा रुग्णालय येथे संपन्न झाला. यावेळी जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाघाये, डॉ. रेखा धकाते तसेच नेत्र विभागातील सर्व कर्मचारी, रुग्ण व नातेवाईक उपस्थित होते.

 

सप्ताहामध्ये संपूर्ण जिल्ह्यात शिबिरे घेऊन रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच डोळ्यांचे आजारा विषयी माहिती देण्यात आली. शासकीय सेवेत असलेले नेत्र चिकित्सक डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांनी अहोरात्र काम केले. त्यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यात 10 जून 1924 रोजी झाला. खडतर परिस्थितीवर मात करून त्यांनी जिद्द व चिकाटीच्या बळावर 80 हजाराहून अधिक नेत्र शस्त्रक्रिया पूर्ण केल्या. अंदाजे डोळे प्रकाशमान करणाऱ्या या दीपस्तंबाची ज्योत 10 जून 1979 रोजी मावळली. 10 जून हा त्यांचा जन्म व मृत्यू हे एकच असल्याचे अवचित्त म्हणून 1982 पासून 10 जून दृष्टिदान दिवस सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो.

 

“असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी “या घोषवाक्याचा आधार घेत डोळ्यांविषयी जनजागृती करून अंध व्यक्तींना नव्याने दृष्टी देण्याचे कार्य जगभर सुरू आहे. त्यासाठी नेत्रदानाचा प्रचार व प्रसार देखील या सप्ताहामध्ये प्रामुख्याने करण्यात येतो. नेत्रदानाकरिता अधिक लोक जागृत करण्याकरिता जिल्हा रुग्णालय येथे माहिती फलक तयार करण्यात आले. या माहिती फलकाचे उद्घाटन डॉ. दीपचंद सोयाम यांच्या हस्ते आज नेत्र विभागा येथे करण्यात आले. नेत्रदान करा नजरेने अमर व्हा या घोषवाक्याचा आधार घेत डोळ्यांविषयी जनजागृती करून अधिकाधिक लोकांना माहिती माहितीफलकाद्वारे देण्यात आलेली आहे.