विनामूल्य नेत्र तपासणी, कृतिम भिंगारोपण व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन 

विनामूल्य नेत्र तपासणी, कृतिम भिंगारोपण व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन 

रविवार, दि. ३ मार्च २०२४ ला दुपारी १२.०० ते ०३.०० स्थळ : पुरुषोत्तमदास बागला कॉन्व्हेंट, नेरी रोड, चिमुर

लॉयन्स आय सेंटर, सेवाग्राम, वर्धा, लॉयन्स क्लब चंद्रपूर महाकाली महावीर इंटरनॅशनल चंद्रपूर केंद्र, बागला चॅरीटेबल ट्रस्ट, चंद्रपूर श्री गुरुदेव सेवा मंडल, चिमुर यांच्या संयुक्त विद्यमानाने चिमुर येथे आयोजीत
विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर

विनामूल्य कृतिम भिंगारोपण मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर या शिबिरात निवडलेल्या रुग्णांची मोफत कृत्रिम भिंगारोपण शस्त्रक्रिया, सोमवार दि. ४ मार्च २०२४ रोजी सेवाग्राम येथे सेवाग्राम मेडीकल कॉलेजच्या नेत्र तज्ञांच्या हस्ते करण्यात येईल.

शिबिरात येतांना पाळायचे नियम
१) आधार कार्ड व रेशनकार्ड ओरिजनल सोबत आणावे, त्याशिवाय तपासणी होणार नाही. २) प्रत्येक रुग्णांनी मास्क लावणे आवश्यक आहे. ३) आपसात ३ ते ६ फुट अंतर राखावे.

शिबिरातील सुविधा •
सेवाग्राम मेडिकल कॉलेज येथील नेत्र विभागातील तज्ञ चमू विनामूल्य मोतीबिंदू डोळ्याची तपासणी करतील. रुग्णांना चिमुर ते सेवाग्राम नेण्याची व वापस आणण्याची सोय लॉयन्स आय हॉस्पिटल सेवाग्राम बसने मोफत करण्यात येईल. शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना निवास, भोजन व औषधे विनामूल्य देण्यात येईल.

डोळे तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांनी शरवक्रियेसाठी जाण्याच्या तयारीने यावे, या रुग्णांना त्याच दिवशी सायंकाळी सेवाग्राम आय हॉस्पिटल ला नेण्यात येईल.

रुग्णांनी स्वतःचे गरम कपडे व पांघरुण व बदलण्यासाठी कपडे आणने आवश्यक आहे.

टिप : वय ५० वर्षावरील रुग्णांची मोतीबिंदूसाठी नेत्र तपासणी करण्यात येईल.

• संपर्क : दिलीप राचलवार-907534221, प्रकाशभाऊ बोकारे-9423643290, क्रीष्णाभाऊ तपासे-9284300837, मिरा पेंडके- 9421032532, सुनिता जोशी- 9767213895, कमल आसावा- 9922407856