जे.एम पटेल महाविदयालयात योग दिनाच्या कार्यक्रमात शेकडो नागरिकांचा सहभाग

जे.एम पटेल महाविदयालयात योग दिनाच्या कार्यक्रमात शेकडो नागरिकांचा सहभाग

करा योग, राहा निरोग

 

भंडारा दि.21 जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भंडारा, आरोग्य् विभाग, शिक्षण विभाग, नेहरु युवा केंद्र, जे.एम.पटेल महाविद्यालय, भंडारा, पतंजली योग समिती, जिल्हा योग संघटना, तसेच जिल्हयातील विविध सामाजिक संघटना यांचे संयुक्त विद्यमाने आज नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे कार्यक्रम जे.एम.पटेल महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते

 

कार्यक्रमाचे उद्घाटन योगेश कुंभेजकर,जिल्हाधिकारी, यांचे शुभहस्ते व प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती.आशा मेश्राम, जिल्हा क्रीडा अधिकारी,, श्रीमती.लिना फालके, निवासी उपजिल्हाधिकारी, डॉ.विकास ढोमणे, प्राचार्य, जे.एम.पटेल महाविद्यालय, तसेच जिल्हा युवा अधिकारी,नेहरु युवा केंद्र हितेंद्र वैद्य, ,डॉ.रमेश खोब्रागडे, जिल्हा प्रभारी भारत स्वामीमान न्यास,.रामविलास सारडा, मार्गदर्शक पंतजली योग परिवार,.रत्नाकर तिडके, जिल्हा प्रभारी पतंजली योग समिती, प्रा.कार्तिक पन्नीकर, श्री.विलास केजरकर, प्रामुख्याने उपस्थित होते.

 

प्रारंभी मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी वृक्ष रोपे देवून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. तद्नंतर डॉ.रमेश खोब्रागडे, यांच्या मार्गदर्शनात श्रीमती.स्नेहल तिडके,श्री.कांचन हटवार, योगाचे मास्टर्स ट्रेनर यांच्या मार्गदर्शनात योग प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. योगमयवातावरणात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात जिल्हयातील सरासरी 500 नागरीकांनी सहभाग नोंदवून योग विषयक माहिती जाणून घेतली.

 

योग अभ्यास शिबीरात ग्रिना, चालन, स्कंध संचालन, स्कंध चक्र, कटी चालान, घुटना संचालन, ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोनासन, भद्रासन, वज्रासन, अर्ध उष्ट्रासन, मरीचासन, भुजंगासन, सेतुबंधासन, उत्तानपादासन, अर्धहस्तासन, पवनममुक्तासन, शवासन, अनुलोम-विलोम, कपालभारती, भ्रामरी प्राणायम, शितली प्राणायाम व ध्यान इत्यादी योग व प्राणायमचा या कार्यक्रमात अभ्यास करण्यात आला.

 

कार्यक्रमाअंतर्गत योगाचे मास्टर्स ट्रेनर्स डॉ.रमेश खोब्रागडे, श्रीमती.कांचन ठाकरे, श्री.कांचन हटवार यांचे मान्यवरांच्या हस्ते वृक्ष रोपे देवून सत्कार करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे संचालक प्राध्यापक श्री.भोजराज श्रीरामे, जे.एम.पटेल महाविद्यालय, भंडारा व उपस्थितांचे आभार श्री.रत्नाकर तिडके, जिल्हा प्रभारी पतंजली योग समिती यांनी मानले.

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.चारुदत्त नाकट, तालुका क्रीडा अधिकारी, श्री.योगेंद्र खोब्रागडे, राज्य क्रीडा मार्गदर्शक, श्री.मंगेश गुडधे, राज्य क्रीडा मार्गदर्शक, श्री.सुरज लेंडे, श्री.सुधिर गळमळे, श्री.अतुल गजभिये,श्री.रामभाऊ धुडसे, तसेच जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, पतंजली योग समिती, आय.एन.ओ., नेहरु युवा केंद्र, जे.एम.पटेल महाविद्यालय, भंडारा येथील कर्मचारी वर्ग व एनसीसी कॅडेट व इतर विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले. व उत्साही वातारणात योग दिनाचे आयोजन संपन्न्‍ झाले.