चोरांसह मोटारसायकल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

चोरांसह मोटारसायकल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

गुन्हयातील संबंधीत प्रकरण असे आहे की, दिनांक ०७/०१/०२४ रोजी रात्र दरम्यान आम्ही पो. नि. नितीनकुमार चिंचोळकर, स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा, स.पो. नि. विवेक सोनवने यांना सोबत स्टाफ पो. हवा. प्रदीप डाहारे, पो. हवा. गेंदलाल खैरे, पो.हवा. किशोर मेश्राम, पो.अ. सचिन देशमुख, पो.अं. कृणाल कडव, चापोना. आशिष तिवाडे, चापोअं कौशीक गजभिये यांना “भंडारा शहर परिसरात ४ ईसम दोन मोटरसायकलनी चोरीच्या मोटर सायकल विक्री करण्यासाठी फिरत आहेत” अशा आशयाचे खबरेची शहानिशा करून कारवाई करण्यासाठी रवाना केले असता सदर पथक पो.स्टे. कारधा परिसरात मौजा सुरेवाडा (पुनर्वसन) पेट्रोलपंप समोरील रोडनी जात असतांनी पथकाला दोन मोटरसायकलनी चार इसम डबलसिट जातांनी दिसले. त्यांचा पाठलाग करून

त्यांना थांबवून त्याचे नाव-गाव तसेच ओळखपत्र बाबत विचारपूस केली असता चारही इसम नागपूरचे राहणारे आढळून आले. त्याचे नावे १) शाहरुख रफीक शेख, वय २९ वर्ष, धंदा-ऑटो चालक रा. जाफर नगर शामलाल लॉन जवळ नागपूर, २) मनोज ऊर्फ पायलट नर्मदाप्रसाद कायरवार वय ३९ वर्ष, रा. झिंगाबाई टाकडी नागपूर, ३) ईरफान रिझवान शेख वय २९ वर्ष रा. मानकापूर फरस चौक इंदिरामाता नगर हनुमान मंदीर जवळ नागपूर, ४) राजेश ऊर्फ चिन्दु बाबुलाल बावनथडे वय २६ वर्ष, रा. मानेगाव बाजार (मकरधोकडा) ह. मु. शिवनगर गोधनी नागपूर असे सांगीतलेवर त्यांचेजवळ असलेले मोटरसायकल तपासले असता १) हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटर विना क्रमांकाची वाहन पोर्टलवर चेसीस क्रमांकावरून पाहणी केल्यावर सदर मोटर सायकल अंदाजे किंमती ३५,०००/-रु पोलीस स्टेशन कारधा येथील गुन्ह्यामधील चोरीची असल्याची आढळून आली. तसेच २) हिरो होंडा सिडी डिलक्स मोटर सायकल वाहन पोर्टलवर इंजिन क्रमांकावरुन पाहणी केल्यावर सदर मोटर सायकल अंदाजे किंमती ४०,०००/-रु पोलीस स्टेशन कोराडी नागपूर येथील गुन्ह्यामधील चोरीची असल्याचे स्पष्ट झाले.

नमुद इसम मोटारसायकल चोरी करणारे असल्याचे समजल्यावरून त्यांना घेवून पंचासह कार्यालयात येवून चारही ईसमांची सखोल विचारपूस केल्यावर त्यांनी एकमत करून चोरी केली असल्याचे कबुल करून याव्यतिरिक्त ईतर चोरी केलेल्या मोटरसायकलची माहिती दिली. त्यांनी चोरलेले मोटरसायकल टाकडी चौक ओव्हरब्रिजच्या खाली असलेल्या अस्थायी असलेल्या मोटरसायकल दुरुस्ती दुकानात ठेवले असल्याचे सांगीतलेवर सदर पथकाला चारही इसमांना घेवून पंचासह नागपूर येथे पाठवून १) हिरो कंपनीची पॅशन प्रो. अंदाजे किंमती ४०,०००/-रु, पोलीस स्टेशन लाखनी, २) हिरो कंपनीची सुपर स्प्लेंडर मोटरसायकल अंदाजे किंमती ४०,०००/-रु पोलीस स्टेशन पवनी, ३) होंडा कंपनीची ड्रिम युगा मोटरसायकल अंदाजे किंमती ३५,०००/-रु पोलीस स्टेशन मानकापूर नागपूर शहर, ४) होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल अंदाजे किंमती ३५,०००/-रु पोलीस स्टेशन सिताबर्डी, ५) हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल अंदाजे किंमती ४०,०००/-रु पोलीस स्टेशन मानकापुर नागपूर येथील

असुन सदर मोटरसायकल जप्त करून ताब्यात घेतले आहेत. वरील प्रमाणे जुने वापरती एकुण ७ मोटरसायकल अंदाजे किं. २,६५,०००/-रु चा मुद्देमाल जप्त करून वर नमुद पथकाने सात गुन्हे उघडकीस आणुन नमूद चारही आरोपीतांना पोलीस स्टेशन कारधा येथे पुढील कारवाईस्तव ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पो. नि. नितीनकुमार चिंचोळकर, पो. हवा. प्रदीप डाहारे, पो. हवा. गेंदलाल खैरे, पो. हवा. किशोर मेश्राम, पो. अं. सचिन देशमुख, पो.

अं. कृणाल कडव, चापोना. आशिष तिवाडे, चापोअं. कौशीक गजभिये सर्व स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा यांनी केलेली आहे.