वसतीगृह प्रवेशासाठी 15 जूनपासुन ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु

चिमूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातंर्गत

वसतीगृह प्रवेशासाठी 15 जूनपासुन ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु

 

चंद्रपूर, दि. 16 : प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूर यांच्या कार्यक्षेत्रातंर्गत चिमूर, वरोरा, भद्रावती, ब्रह्मपुरी व नागभीड या तालुक्याच्या स्तरावर आदिवासी मुला-मुलींचे शासकीय वसतीगृह कार्यरत आहे. या वसतीगृहामध्ये प्रवेश मिळविण्याच्या अनुषंगाने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया दि. 15 जून 2023 पासून swayammahaonline.gov.in या संकेतस्थळावर सुरू करण्यात आली आहे.

 

नवीन प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर्वसाधारण अभ्यासक्रमाच्या (8वी, 11वी, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम) प्रवेश प्रक्रियेकरीता सदर संकेतस्थळ 25 जुलै 2023 पर्यंत सुरू राहील. व्यावसायिक अभ्यासक्रमाचे (अभियांत्रिकी, वैद्यकीय) नवीन प्रवेश प्रक्रियेकरीता सदर संकेतस्थळ 30 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरू राहील. तसेच खास बाब शिफारसी 15 ऑगस्ट 2023 पर्यंत कार्यालयास सादर करण्यात याव्यात, असे चिमुर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी निलय राठोड यांनी कळविले आहे.