दिव्यांग सहाय्यता शिबिरात दोनशेहून अधिक रुग्णांची तपासणी

दिव्यांग सहाय्यता शिबिरात दोनशेहून अधिक रुग्णांची तपासणी

 

भंडारा, दि. 14 : शासन आपल्या दारी या उपक्रमातंर्गत काल ग्रामीण रुग्णालय, लाखांदूर येथे दिव्यांग सहायता शिबिर पार पडले. या शिबीरात 230 रूग्णांची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात शासन आपल्या दारीच्या माध्यमातून आरोग्य सेवा नागरिकांपर्यत पोहोचविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हे शिबिर घेण्यात आले.

 

यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. दिपचंद सोयाम यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिरात अस्थीरोगतज्ञ डॉ. दिनेश कुथे, नेत्ररोग तज्ञ डॉ. विनोद घडसिंग, कान, नाक घसा तज्ञ डॉ. बंडू नगराडे, मानसिक रोगतज्ञ डॉ. अरविंद साखरे तसेच ग्रामीण रुग्णालय लाखांदूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय ठाकरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वंजारे व डॉ. लांजेवार उपस्थित होते. या शिबिरामधे एकुण 230 रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी नेत्र तपासणी- 59, मानसिक रोग तपासणी-15, नाक- कान -घसा तपासणी-32, अस्थीरोग तपासणी-77, इत्यादी रुग्णांचे मुल्यांकन करुन संगणीकृत प्रमाणपत्रासाठी सामान्य रुग्णालय, भंडारा येथे संदर्भीत करण्यात आले आहे.