डी. एल. एड प्रथम ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरूवात

डी. एल. एड प्रथम ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरूवात

 

भंडारा, दि. 13 : चालू शैक्षणिक वर्षासाठी डी. एल. एड प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत आहे. आजपासून या प्रक्रियेला सुरवात झाली. www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

 

अर्ज भरण्यासाठी उमेदवाराचा स्वत:चा ई-मेल असावा. उमेदवारास एकापेक्षा जास्त माध्यमासाठी अर्ज करावयाचा असेल तर प्रत्येक माध्यमाच्या संवर्गानुसार स्वतंत्र आवेदनपत्र व शुल्क भरावे लागेल. खुल्या संवर्गासाठी किमान 49.5 टक्के गुण व खुला संवर्ग वगळून अन्य संवर्गासाठी किमान 44.5 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तरी उमेदवारांनी या बाबतीत काही अडचणी असल्यास support@deledadmission.in या ई-मेलवर पाठविण्याचे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या राधा अतकरी यांनी कळविले आहे.