विशेष मासिक शिबीराचे 11 सप्टेंबर रोजी आयोजन

विशेष मासिक शिबीराचे 11 सप्टेंबर रोजी आयोजन

भंडारा दि.2 : मतदार याद्यातील तपशीलाची प्रमाणीरकरणासाठी मतदारांकडून ऐच्छीकपणे आधारची माहिती संग्रहीत करण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांचा लोकसहभाग साद्ध करण्याकरीता रविवार 11 सप्टेंबर रोजी विशेष मासिक शिबीराचे आयोजन भंडारा तहसिल कार्यालयात करण्यात आले आहे.

61 भंडारा अ.जा विधानसभा मतदार संघातील तालुक्यातील मतदान संघातील भंडारा तालुक्यातील मतदान केंद्रच्या परिसरामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे मार्फत घरोघरी भेट देण्याकरीता रविवार दिनांक 11 सप्टेंबर 2022 रोजी मासिक विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. करीता जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे हस्तलिखीत नमुना 6ब किंवा Garuda App (गरुडा ॲप) व्दारे मतदान ओळखपत्रासोबत आधारकार्डची जोडणी करावी. किंवा स्वत: मतदान हा Voter Helpline App व्दारे सुद्धा मतदान ओळखपत्रासोबत आधारकार्डची जोडणी करू शकतो, याची सर्व मतदारांनी नोंद घ्यावी, असे सहायक मतदार नोंदणी अधिकारी, तथा तहसिलदार अरविंद हिंगे यानी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.