भंडारा : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 10 ऑक्टोंबरला

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 10 ऑक्टोंबरला

भंडारा,दि.6:- इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळ, सर्व माध्यम, अनुदानित किंवा विना अनुदानित व कायम विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2021 (महाटीईटी-2021) 10 ऑक्टोंबर 2021 रोजी घेण्यात येणार आहे.

या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, अनुषांगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 25 ऑगस्ट 2021 अखेरपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. असे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी कळविले आहे.