अनोख्या पध्दतीने वाहन चालकांना केले मार्गदर्शन

अनोख्या पध्दतीने वाहन चालकांना केले मार्गदर्शन

चंद्रपूर शहर वाहतुक शाखेकडुन नियमांचे पालन करणारे वाहन चालकांना थंड पेयाचे वाटप

रस्त्यावर वाहन चालवितांना वाहतुक नियमांचे योग्य पालन व्हावे या करीता वाहतुक नियंत्रण शाखा चंद्रपूर तर्फे चंद्रपूर ते नागपूर रोड तसेच चंद्रपूर ते मुल रोड आणि चंद्रपूर ते बल्लारपुर रोड या राज्यमार्गावर वाहन चालकांना थांबवुन त्यांना वाहतुक नियमांचे पालन करण्याकरीता वाहतुक नियमांचे महत्व व मोटार वाहन कायद्याविषयी माहिती देवुन मार्गदर्शन करुन जनजागृती करण्यात आली.

तसेच महामार्गावर हेल्मेट परिधान करणाऱ्या दुचाकीस्वार तसेच चारचाकी वाहनामध्ये सिटबेल्ट लावुन वाहतुक नियमांचे पालन करणाऱ्या वाहन धारकांना वाहतुक नियंत्रण शाखे कडुन थंड पेय वाटप करुन वाहतुक नियमांचे योग्य पालन केल्याबाबत संबंधीत नागरीकांचे अभिनंदन करण्यात आले.

सदरची मोहीम पोलीस निरीक्षक श्री रोशन यादव, आणि पोलीस निरीक्षक श्री प्रविणकुमार पाटील यांचे नेतृत्वात वाहतुक नियंत्रण शाखा चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार यांनी राबविली. तसेच जिल्हयात अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच अपघाती मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हयातील सर्व नागरीकांनी वाहतुक नियमांचे योग्य पालन करावे याबाबत चंद्रपूर पोलीस दलातर्फे येत आहे. गाय ख जाहीर आवाहन करण्यात येत आहे.