पात्र लाभार्थ्यांना गहू, मका, तांदूळ, साखर व शिधासंच यांचे नियतन व वाटप

अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील पात्र लाभार्थ्यांना
गहू, मका, तांदूळ, साखर व शिधासंच यांचे नियतन व वाटप

गडचिरोली,दि.30: सर्व रेशन कार्डधारकांना सुचित करण्यात येते की, गडचिरोली जिल्हयातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम ,2013 अंतर्गत माहे सप्टेंबर, 2023 या महिन्याकरीता अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील पात्र लाभार्थ्यांना गहू, मका, तांदूळ, साखर व शिधासंच यांचे नियतन व वाटप परिमाण खालील प्रमाणे निश्चित केले आहे.

अ.क्र योजना / शिधापत्रिका प्रकार निर्धारित वाटप परिमाण मोफत प्रति किलो रुपये शिधाजिन्नस संच
(आकडे किलो मध्ये )
तपशिल तांदूळ गहू मका साखर तांदूळ गहू मका साखर प्रतिसंच रुपये
1 अंत्योदय अन्न योजना प्रती शिधापत्रिका 25 5 5 1 0 0 0 20 100
2 प्राधान्य कुटुंब लाभार्थी प्रती व्यक्ती 3 1 1 — 0 0 0 — 100

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना रु.3/- प्रतिकिलो तांदूळ, रु.2/- प्रतिकिलो गहू व रु.1/- प्रतिकिलो भरडधान्य या दराने वितरीत करण्यात येणारे अन्नधान्य दिनांक 01 जानेवारी, 2023 ते 31.12.2023 पर्यंत एक वर्षाच्या कालावधीकरीता अनुज्ञेय असलेले अन्नधान्य पात्र लाभार्थ्यांना “मोफत” वितरीत करावयाचे शासन निर्देश प्राप्त आहे.

तसेच या जिल्हयात मका हे भरडधान्याची खरेदी करण्यात आलेली असून खरेदी केलेला मका या भरडधान्याचे सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरण करण्याचे शासन निर्देश प्राप्त असून सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत गडचिरोली जिल्हयातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांसाठी माहे सप्टेंबर, 2023 या महिन्याकरीता गव्हाचे नियतन कमी करुन त्याऐवजी मक्याचे वितरण करण्यात येत आहे.
तसेच शासन पत्र अन्वये जिल्हयातील रास्तभाव दुकानामर्फतीने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजनेतील व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना अगामी गुढीपाडवा अगामी गौरी-गणपती उत्सवानिमित्त “आनंदाचा शिधा” प्रतिशिधापत्रिका 1 शिधासंच (1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 किलो साखर व 1 लिटर पामतेल) या 4 शिधाजिन्नस माहे सप्टेंबर, 2023 या महिन्याकरीता ई-पॉस प्रणालीव्दारे रु. 100/- प्रतिसंच या सवलतीच्या दराने वाटप करण्यात येत आहे.

तरी सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना सुचित करण्यात येते की, त्यांना नेमून दिलेल्या रास्तभाव धान्यदुकानात जावून आपले शिधापत्रिकेवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील माहे सप्टेंबर, 2023 या महिन्यातील नियमित देय असलेल्या धान्याची (गहू, मका व तांदूळ) मोफत उचल करावी. व धान्य घेतेवेळी POS मशीन मधून निघणारी पावती रास्तभाव दुकानदाराकडून घ्यावी व सोबतच नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रतिशिधापत्रिका 1 आनंदाचा शिधा रु. 100/- प्रतीसंच ची उचल करावी. दुकानांत एकाच वेळी गर्दी न करता सामाजिक अंतराचे पालन करावे. असे जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.