पंचायत समिती, आरमोरीची वार्षिक आमसभा ०५ जूनला

पंचायत समिती, आरमोरीची वार्षिक आमसभा ०५ जूनला

 

गडचिरोली, दि.०२ : पंचायत समिती, आरमोरी ची सन २०२२-२३ या वर्षाची वार्षिक आमसभा दिनांक ०५ जूनला सोमवार रोजी नवीन प्रशासकीय भवन सभागृह, तहसिल कार्यालय आरमोरी येथे स. ११.०० वा. आयोजित करण्यात आली आहे. कृष्णाजी गजबे, आमदार, ६७- आरमोरी विधानसभा निर्वाचन क्षेत्र यांचे अध्यक्षतेखाली सदर सभा आयोजीत करण्यात आलेली

आहे. त्याअनुषंगाने पंचायत समिती, आरमोरीचे सदर वार्षिक आमसभेला संबंधितानी उपस्थित राहणेबाबत विनंती करण्यात येत आहे.