सर्वोदय महाविद्यालय सिदेवाही येथे आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे आयोजन संपन्न

सर्वोदय महाविद्यालय सिदेवाही येथे आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे आयोजन संपन्न

सिंदेवाही
सर्वोदय महाविद्यालय सिदेवाही येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन. राष्ट्रीय सेवा योजना व क्रीडा विभागाच्या वतीने योग दिन साजरा करण्यात आला.
डॉ. लेमदेव नागलवाडे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी यांच्या उपस्थितीत योग गुरू दिनेश राहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली योग व प्राणायाम कार्यक्रम घेण्यात आले.
या कार्यक्रमात योग व प्राणायाम चे जनजागृती करून आरोग्यासाठी फायदा कसा होतो या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. सोबत योग व प्राणायाम प्रशिक्षण देण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाला प्रा. टि. पी. बिसेन, डॉ. शेखर डोंगरे, मधुकर जल्लावार , मनोहर मुंगले,नितीन सागुळले, शुभांगी मानकर व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.