लाखांदूर येथे तालुकास्तरीय सुधारक सन्मान पुरस्कार वितरण

लाखांदूर येथे तालुकास्तरीय सुधारक सन्मान पुरस्कार वितरण

· 24 पुरुष सुधारक पुरस्काराने सन्मानित

 

भंडारा, दि. 25 मे : महिला आर्थिक विकास महामंडळ भंडारा व महेश्वरी लोकसंचालित साधन केंद्र, लाखांदूर च्या वतीने आज दि. 24 मे 2023 रोजी तहसील कार्यालय, लाखांदूर येथे महेश्वरी लोकसंचालित साधन केंद्र अंतर्गत येणाऱ्या गावातील 24 पुरुषांना तालुकास्तरीय सुधारक सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

नव तेजस्विनी उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत जेंडर न्यूट्रिशन या घटकामार्फत महिला सक्षमीकरणासाठी गाव पातळीवर पुढाकार घेत असलेल्या प्रति गाव एक प्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 196 जयंतीचे औचित्य साधून सुधारक सन्मान पुरस्कार वितरित करण्यात आले. आपल्या जिल्ह्यातील बालविवाह व अन्य अनिष्ट रूढी प्रथा यांना आळा घालणे व बचत गटातील महिलांनी तसेच त्यांच्या कुटुंबातील पुरुषांनी महिलांचा विकासासाठी गावात कार्य करावे, हेच या पुरस्काराचे उद्देश आहे. या कार्यक्रमाला नायब तहसीलदार श्री. मेश्राम, खंडविकास अधिकारी श्री. खुणे, महेश्वरी लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा जांभुळकर, व्यवस्थापक लता धुर्वे उपस्थित होत्या.