कुरखेडा येथे 23 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबीर

कुरखेडा येथे 23 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबीर

गडचिरोली, दि.12 : समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्काचे संरक्षण होवुन न्याय मिळावा, यादृष्टिने महिलांच्या तक्रारी/अडचनी यांची शासकिय यंत्रणेकडुन सोडवणुक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, महिलां करीता शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती महिलांना उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने तसेच त्यांच्या स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याकरीता दिनांक 23/05/2023 ला सकाळी 10.00 वाजता तहसिल कार्यालय, कुरखेडा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबीर आयोजित केलेला आहे. तरी समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी विहीत नमुन्यात लेखी अर्ज/तक्रारीसह (3 प्रती मध्ये) स्वत: शिबीराच्या ठिकाणी उपस्थित रहावे. लेखी अर्जाचा नमुना गावातील प्रत्येक अंगणवाडी ग्रामपंचायत तलाठी कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. अधिक माहिती करीता तहसिल कार्यालय, कुरखेडा किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (पंचायत समिती परीसर) कुरखेडा यांचेशी संपर्क साधावा असे प्र.तहसिलदार तथा अध्यक्ष, तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन समिती, कुरखेडा यांनी कळविले आहे.