कार्यबल समितीची सभा संपन्न

कार्यबल समितीची सभा संपन्न

भंडारा, दि. 8 : जिल्हास्तरीय कार्यबल समितीची सभा आज जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

सभेमध्ये जिल्हा अग्रणी बँक, जिल्हा ग्रामोद्योग, महिला आर्थीक विकास महामंडळ, सहाय्यक आयुक्त समाजिक न्याय व विशेषसहाय्यता विभाग व प्रकल्प अधिकारी आयटीडीपी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सन 2023-24 अंतर्गत प्राप्त झालेले 57 अर्ज बँकेकडे मंजूरी करिता पाठविण्याकरिता जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी मंजूरी प्रदानकेली.