गुणवंत खेळाडू व मार्गदर्शक पुरस्काराकरिता अर्ज आमंत्रीत

गुणवंत खेळाडू व मार्गदर्शक पुरस्काराकरिता अर्ज आमंत्रीत

 

भंडारा दि. 3 : सन 2022-23३ या वर्षासाठी जिल्हयातून गुणवंत खेळाडू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक या जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

 

पुरस्काराअंतर्गत जिल्हयातून जास्तीत जास्त चार पुरस्कार देण्यात येतील. यात गुणवंत खेळाडू पुरस्कार- 3 (1 महिला, 1 पुरुष व 1 दिव्यांग खेळाडू), व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक असा प्रत्येकी एक पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरुप प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व रुपये 10 हजार असणार आहे.

 

पुरस्काराकरिता अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग 15 वर्ष वास्तव्य असणे आवश्यक आहे. गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराकरीता जिल्हयामध्ये सतत 10 वर्ष त्या जिल्हयात क्रीडा मार्गदर्शकांचे कार्य असले पाहीजे व वयाची 30 वर्ष पुर्ण केलेली असणे आवश्यक आहे. गुणांकणाकरीता त्या जिल्हयातील खेळाडूंचीच कागगिरी ग्राह्य धरली जाईल.

 

गुणवंत खेळाडू पुरस्काराकरीता खेळाडूने पुरस्कार वर्षासह लगत पुर्व 5 वर्षापैकी 2 वर्ष त्या जिल्हयाचे मान्यताप्राप्त खेळांच्या अधिकृत स्पर्धामध्ये प्रतिनिधित्व केले असले पाहीजे. पुरस्काराचे वर्ष 1 जुलै ते 30 जून या कालावधी मधील राहील.

 

पुरस्काराकरिता वरिल अटी व शर्तीची पुर्तता करणाऱ्या व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या जिल्हयातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत खेळाडू यांनी पुरस्काराचा विहीत नमुन्यातील अर्ज व अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे आपला अर्ज 15 मे 2023 पर्यंत सादर करावा.

 

अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा संकुल, बस स्थानक शेजारी, भंडारा येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम यांनी

केले आहे.