जिल्ह्यात वादळी वारा, पाऊस, गारपीट व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज

जिल्ह्यात वादळी वारा, पाऊस, गारपीट व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज

Ø 1 ते 2 मे या दिवसांकरीता यलो तर 28 ते 30 एप्रिल कालावधीकरीता ऑंरेज अलर्ट जारी

Ø नागरीकांना विषेशत: शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या सुचना

 

चंद्रपूर, दि. 28: भारतीय हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्यात दि. 28 एप्रिल ते 2 मे 2023 या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जिल्‍ह्यातील बहुतांश ठिकाणी व जिल्‍ह्यातल एक दोन ठिकाणी विजांच्‍या कडकडाटासह मेघगर्जना, वादळ वारा (वेग 40-50 कि.मी. प्रति तास) गारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असून दि. 1 ते 2 मे 2023 या दिवसांकरीता यलो अलर्ट व दि. 28 ते 30 एप्रिल 2023 या कालावधीकरीता ऑंरेज अलर्ट जारी केला आहे.

 

याअनुषंगाने नागरीकांनी विषेशतः शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घ्‍यावी. पाऊस व गारपिटीचा अंदाज लक्षात घेता रब्बी हंगामातील परिपक्व अवस्थेतील (हरभरा,गहू, मोहरी, जवस इत्यादी.) पिकाची आवश्यक काळजी घ्यावी. विजगर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. शेतात कामाला जात असतांना अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये. विजगर्जना सुरू असतांना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. पाऊस व विजगर्जना होत असतांना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये व शेतात काम करत असतांना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. जनावरांना मोकळ्या जागेत चारावयास सोडण्याचे टाळावे तसेच गोठ्यामधेच चारा व पाण्याची उपलब्धता करून द्यावी.

 

नागरिकांनी व शेतकऱ्यांनी शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे, शेतातील पिकांची, जनावरांची आवश्यक काळजी घ्यावी व स्वसंरक्षणासाठी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.