अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत दि भंडारा जिल्हा कनोईंग अॅण्ड कयाकिंग असोसिएशनच्या खेळाडूंची 10 पदकांची कमाई

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत दि भंडारा जिल्हा कनोईंग अॅण्ड कयाकिंग असोसिएशनच्या खेळाडूंची 10 पदकांची कमाई

 

भंडारा, दि. 10 : २४ ते २९ मार्च पर्यंत करनाल (हरियाणा) येथे अखिल भारतीय आंतरविद्यापीठ आयोजित कनोईंग अॅण्ड कयाकिंग, टी बी आर स्पर्धेत दि भंडारा जिल्हा कनोईंग अॅण्ड कयाकिंग असोसिएशनचे एकुण ३४ खेळाडूंनी सहभाग घेवून नागपूर विद्यापीठाला संपूर्ण अखिल भारतीय विद्यापीठात मानाचे स्थान मिळवून दिले आहे.

 

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कनोईंग अॅण्ड कयाकिंग स्पर्धेतील एकुण २२ क्रीडा प्रकारांपैकी १० क्रीडा प्रकारात दि भंडारा जिल्हा कनोईंग अॅण्ड कयाकिंग असोसिएशनच्या खेळाडूंनी १ सुवर्ण, ४ रजत ५ कास्य पदक प्राप्त करुन आपले अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्तरावरील वर्चस्व कायम ठेवले आहे. दि भंडारा जिल्हा कनोईंग अॅण्ड कयाकिंग असोसिएशनचे मुख्य मार्गदर्शक सुभाष जमजारे, स्वप्नील करकाडे, भुवण भेंडारकर प्रशिक्षक अविनाश निंबार्ते, पुजा बेंदेवार यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत संघ सहभागी झाला होता.

 

मुलींमध्ये १) निता शेन्डे के १ – २०० मी. सुवर्ण, के. १ – १०००मी. कास्य, टी बी आर – ५०० मी. रजत पदक, २) सबिना लांडगे सी, २- २००मी., रजत पदक, सी,१-१०००मी. कास्य पदक, कॅनो स्लॅलम कास्य पदक, टी बी आर रजत पदक ३) वैष्णवी आजबले – के. २- १०००मी. रजत पदक, के. ४-१०००मी. कास्य पदक, टी बी आर रजत पदक. – ४) मुस्कान उके के, २ -१०००मी. रजत पदक, के, ४-१०००मी. कास्य पदक, टी बी आर- रजत पदक ५) आचल भुरे के,४-१०००मी. कास्य पदक, टी बी आर रजत पदक, ६) संजना कंगाले के, ४-१०००मी. कास्य पदक, टी बी आर रजतपदक ७) रुपाली – टांगले सी.२-२००मी. रजत पदक, टी बी आर रजत पदक ८) श्रध्दा साठवणे, टी बी आर ५००मी. रजत पदक ९ ) शालीनी मडामे टी बी आर ५००मी. रजत पदक १०) साक्षी साकुरे टी बी आर ५००मी. रजत पदक ११ ) प्रणाली तरारे टी बी आर ५००मी. रजत पदक (१२) मोनल मोहनकर टी बी आर ५००मी. रजत पदक १३ ) प्रतिक्षा शहारे टी बी आर ५००मी. रजत पदक १४) मयुरी साठवणे, टी बी आर ५००मी. रजत पदक १५) संतोषी शहारे टी बी आर ५००मी. रजत पदक प्राप्त केले. तर मुलांमध्ये १) वैभव वंजारी टी बी आर – २०० मी. कास्य पदक २) कुलदीप वंजारी टी. बी आर २०० मी. कास्य पदक व १००० मी. रजतपदक ३) दिशाल सोनबावने टी बी आर २०० मी. कास्य पदक व १००० मी. रजतपदक ४) चैतन्य खोब्रागडे टी बी आर- २०० मी. कास्य पदक ५) ललीत वैद्य टी बी आर – १००० मी. रजतपदक ६ ) अमिर निंबार्ते टी बी आर २०० मी. कास्य पदक व १००० मी. रजतपदक ७) विलास बोरकर टी बी आर २०० मी. कास्य पदक व १००० मी. रजतपदक ८) दर्शन बेंदेवार टी बी – आर – २०० मी. कास्य पदक व १००० मी. रजतपदक ९ ) भुषण बोरकर टी बी आर – २०० मी. कास्य पदक व १००० मी. रजतपदक १०) प्रशांत ताईतकर टी बी आर – २०० मी. कास्य पदक व १००० मी. रजतपदक ११ ) करण वाघाये टी बी आर – २०० मी. कास्य पदक व १००० मी. रजतपदक १२) करण शेन्डे टी बी आर – २०० मी. कास्य पदक व १००० मी. रजतपदक १३ ) श्रीवंत शेन्डे टी बी आर २०० मी. कास्य पदक व – १००० मी. रजतपदक १४) गौरव निबातें टी बी आर २०० मी. कास्य पदक व – १००० मी. रजतपदक १५) सौरभ भोंदे टी बी आर २०० मी. कास्य पदक व १००० – मी. रजतपदक १६ ) तुषार निबांतें टी बी आर – १००० मी. रजतपदक मिळवीले.