भंडारा || इज ऑफ डुइंग बाबत कार्यशाळा संपन्न

भंडारा || इज ऑफ डुइंग बाबत कार्यशाळा संपन्न

 

भंडारा दि. 17 : व्यावसायिक व उद्योग यांच्यामध्ये जागृती निर्माण होण्यासाठी मुंबई येथील उद्योग संचालनालय आणि मैत्री कक्ष मार्फत नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय येथे कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेकरिता सहसंचालक मैत्री कक्ष, मुंबई योगेश कुंभलवार (Eodb Team व Maitri Team) अनिर्बंध दत्तगुप्ता, श्रीमती रीना मिरांडा, अध्यक्ष औद्योगीक सहकारी संस्था सुनिल रंभाड व महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र भुनेश्वर शिवणकर उपस्थित होते.

या कार्यशाळेत आय.टी पातळीवर आणि नियामक पातळीवर केल्या जाणाऱ्या सुधारणा व शासनाने राबविलेल्या विविध सुधारणाविषयी वापरकर्त्याकडून अभिप्राय घेण्यासाठी इज ऑफ डुइंग बिझनेस सुधारणांबद्दल सादरीकरण करण्यात आले.

कार्यशाळेत शासनाचे इज ऑफ डुइंग बिझनेस योजनेमध्ये शासनाने राबविलेल्या सुधारणांची माहिती देण्यात आली. त्यात उद्योजकांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यात आले. या कार्यशाळेत जिल्ह्यामधील औद्योगिक संघटना प्रतिनिधी, नामांकित उद्योजक, भावी उद्योजक, सनदी लेखापाल, वास्तु रचनाकार, उद्योग व्यवसायाशी संबंधित असणारे शासकीय विभागाचे अधिकारी तथा सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.