गडचिरोली जिल्ह्यातील 18 मतदान केंद्रावर 91.53 टक्के मतदान

गडचिरोली जिल्ह्यातील 18 मतदान केंद्रावर 91.53 टक्के मतदान

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ

गडचिरोली,(जिमाका)दि.30:नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक 2023 मध्ये गडचिरोली जिल्ह्यात एकूण 18 मतदान केंद्रावर 91.53 मतदान झाले. जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 वा. पर्यत पार पडली. एकूण 18 मतदान केंद्रावर 3211 मतदार मतदान करणार होते. यात 631 स्त्री, 2580 पुरुष मतदारांचा समावेश होता. पैकी स्त्री मतदार 563, पुरुष मतदार 2376 जणांनी प्रत्यक्ष मतदान केले. मतदान झालेल्या मतदारांची संख्या 2939 असून याची एकूण टक्केवारी 91.53 टक्के आहे.

मतदान केंद्र निहाय टक्केवारी यात 107 क्रमांकाच्या देसाईगंज मतदान केंद्रावर 223 पैकी 221 जणांनी मतदान केले. 108 क्रमांकाच्या कुरखेडा मतदान केंद्रावर 212 पैकी 194 जणांनी मतदान केले. 109 क्रमांकाच्या कढोली मतदान केंद्रावर 91 पैकी 89 जणांनी मतदान केले. 110 क्रमांकाच्या आरमोरी मतदान केंद्रावर 275 पैकी 256 जणांनी मतदान केले. 111 क्रमांकाच्या वडधा मतदान केंद्रावर 126 पैकी 119 जणांनी मतदान केले. 112 क्रमांकाच्या गडचिरोली मतदान केंद्रावर 494 पैकी 438 जणांनी मतदान केले. 113 क्रमांकाच्या अमिर्झा मतदान केंद्रावर 121 पैकी 116 जणांनी मतदान केले. 114 क्रमांकाच्या धानोरा मतदान केंद्रावर 180 पैकी 164 जणांनी मतदान केले. 115 क्रमांकाच्या चामोर्शी मतदान केंद्रावर 338 पैकी 308 जणांनी मतदान केले. 116 क्रमांकाच्या आष्टी मतदान केंद्रावर 227 जणापैकी 202 जणांनी मतदान केले. 117 क्रमांकाच्या मुलचेरा मतदान केंद्रावर 153 पैकी 142 जणांनी मतदान केले. 118 क्रमांकाच्या कोरची मतदान केंद्रावर 151 पैकी 143 जणांनी मतदान केले. 119 क्रमांकाच्या अहेरी मतदान केंद्रावर 158 पैकी 147 जणांनी मतदान केले. 120 क्रमांकाच्या आलापल्ली मतदान केंद्रावर 136 पैकी 129 जणांनी मतदान केले. 121 क्रमांकाच्या एटापल्ली मतदान केंद्रावर 140 पैकी 110 जणांनी मतदान केले. 122 क्रमांकाच्या भामरागड मतदान केंद्रावर 48 पैकी 47 जणांनी मतदान केले. 123 क्रमांकाच्या सिरोंचा मतदान केंद्रावर 100 पैकी 85 जणांनी मतदान केले. 124 क्रमांकाच्या अंकिसा मतदान केंद्रावर 38 पैकी 29 जणांनी मतदान केले. असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांनी कळविले आहे.