ट्रक चालकाच्या चुकीमुळे अपघात घडला….

ट्रक चालकाच्या चुकीमुळे अपघात घडला….

सिंदेवाही तालुक्यातील सरडपार बस स्थानक समोर ट्रक चालकाच्या चुकीमुळे अपघात होवुन एका पंधरा वर्षीय मुलीचा पाय तुटून चुराडा झाला आहे. मुलिचा जिव जाता जाता वाचला सिंदेवाही वरुन गडचिरोली जाण्यासाठी दुचाकिने जात असतांना दुचाकिला मागच्या बाजुने ट्रक चालकांनी दुचाकिला जोरदार धडक दिली. त्यामुळे मुलगी दुचाकीवरून खाली पडली त्यानंतर अपघात ठळु शकला असता परंतु ट्रक चालकांनी ट्रक मागे न घेता पुन्हा समोर चालविल्याने मुलीच्या पायावरून ट्रकचा चाक गेल्याने पायाचा चुरा चुरा झाला आहे. प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात सिंदेवाही येथे दाखल करण्यात आले होते मात्र गंभीर दुखापत असल्याने जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले त्यानंतर लगेच नागपूर ला उपचारासाठी हलविण्यात आले आहे अशी संपूर्ण घटनेचा माहिती अपघात ग्रस्त असलेल्या छोट्या बहिणीने दिले आहे.

अपघात झालेल्या मुलिचे नाव आचल अशोक मांदाळे गडचिरोली जिल्ह्यातील नवेगाव मूरखळा येथील असुन ट्रक चालकाचा भक्तप्रलाद पुरनपाल नाव असुन बल्लारपूर इथला आहे घटनास्थळी पोलिस येवुन पंचनामा करून ट्रक चालकाला अटक केली आहे