तुती नर्सरी व लागवडीबाबत कार्यशाळेचे आयोजन

तुती नर्सरी व लागवडीबाबत कार्यशाळेचे आयोजन

 

भंडारा दि. 30: महारेशीम अभियान सन-2023 अंतर्गत सन 2022-23 साठी निवड केलेल्या जिल्ह्यातील नवीन शेतकऱ्यांसाठी “तुती नर्सरी व लागवड पुर्व प्रशिक्षण” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेचे आयोजन 31 जानेवारी 2023 रोजी मूलभूत सुविधा केंद्र, जमनी येथे करण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी “तुती नर्सरी व लागवड पुर्व प्रशिक्षण” या एक दिवसीय कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेशीम विकास कार्यालयाने केले आहे.