लाईव्ह संजीवनी ऑर्थोपेडीक रुग्णालयात मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

लाईव्ह संजीवनी ऑर्थोपेडीक रुग्णालयात मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

चंद्रपूर, दि. 7 जुलै : राज्यामध्ये कोविड-19 या साथीच्या आजारावरील रुग्णावर उपचार करण्यासाठी पॅरामेडीकल क्षेत्रातील प्रशिक्षित मानव संसाधणाची आवश्यकता आहे. यासाठी कौशल्य प्रशिक्षणाशी निगडीत पॅरामेडीकल क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम उदघाटन समारंभ दि. 8 जुलै रोजी दुपारी 3 वाजता ऑनलाईन स्वरुपात तुकूम येथील लाईव्ह संजीवनी आर्थोपेडीक रुग्णालयात आयोजीत करण्यात आला आहे.

सदर कार्यक्रमाचे ऑनलाईन उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते पार पडणार आहे. या उदघाटन कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक, आरोग्य मंत्री राजेश टोपे , वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता राज्यमंत्री शंभुराज देसाई, सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकिय शिक्षण विभाग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.

शासकीय वैदयकीय महाविद्यालय, चंद्रपुर येथे व ब्रम्हपुरी हॉस्पीटल अॅन्ड रिसर्च इन्स्टिट्युट, ब्रम्हपुरी येथे फेलोबोटॉमिस्ट या कोर्सचे क्लासेस सुरु होत आहे, तसेच इमर्जन्सी मेडीकल टेक्नीशियन-बेसीक, हॉस्पीटल फ्रन्ट डेस्क को-ऑर्डिनेटर, ड्रेसर-मेडीकल, जनरल डयुटी असिस्टंट अॅडव्हान्स, अॅम्बुलन्स ड्रायव्हर हे कोर्सेस सुरु होणार आहेत.

सदर कार्यक्रम लाईव्ह संजीवनी ऑर्थोपेडीक व फ्रॅक्चर हॉस्पीटल, तुकुम या ट्रेनिंग सेंटरला आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, सहायक आयुक्त, भैयाजी येरमे, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक मुकेश मुंजनकर व संजिवनी हॉस्पिटलचे व्यवस्थापक डॉ.अरूण कुलकर्णी, डॉ.केतकी कुलकर्णी उपस्थित राहणार आहे.

या उदघाटन कार्यक्रमाचे युट्युब व फेसबुकवर लाईव्ह प्रक्षेपण असणार आहे. मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत चंद्रपुर जिल्हयात 600 कुशल मनुष्यबळ निर्मिती करण्याचे उददीष्ट आहे. या कार्यक्रमानिमित्त स्वस्थ महाराष्ट्र सक्षम महाराष्ट्र निर्माण करण्याचा उददेश आहे.