chandrapur I सिंदेवाही : महात्मा गांधी तंटा मुक्त गाव समिती विरव्हा यांच्या मार्फत विवाह संपन्न.

सिंदेवाही : महात्मा गांधी तंटा मुक्त गाव समिती विरव्हा यांच्या मार्फत विवाह संपन्न.

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील विरव्हा येथील महात्मा गांधी तंटा मुक्त गाव समिती यांच्या व गावकऱ्यांच्या समक्ष मौजा इटोली येथील मुलगा योगेश नीलकंठ दोहतुरे वय वर्षे 24 आणि गडचिरोली ज़िल्हातील धानोरा तालुक्यातील मौजा जप्पी येथील मुलगी पिंकी शालिकराव गेडाम वय वर्षे 21 यांचा आज दिनांक 24/03/2021 रोजी दुपारी 3.00 वाजता म. गांधी तं. मुक्ती समितीच्या माध्यमातुन विवाह करण्यात आले.
या प्रसंगी तं. मु गाव समितीचे अध्यक्ष रामदासजी शेंडे, पोलीस पाटील राजेंद्रजी सावसाकडे, सरपंच रमेशजी चौधरी, देवरावजी वाकडे,वामन खोब्रागडे, काशिनाथ ढोक, गुलाब वाकडे, चंद्रहास धारणे, प्रकाश वाकडे उमाजी चौधरी व इतर सदस्य आणि गावकरी मंडळी यांच्या उपस्थित पार पडलं