राष्ट्रीय युवा दिना निमित्त एडस सचेतन रॅली व स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन

राष्ट्रीय युवा दिना निमित्त एडस सचेतन रॅली व स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन

 

भंडारा दि. 24: महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण सोसायटी मुंबई यांचेकडून 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा साजरा करण्यातआला. या दिनाचे औचित्य साधून व एचआयव्ही एड्सविषयी युवकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टिने 12 ते 26 जानेवारी 2023 या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. यावर्षीचे युवा दिनाचे घोषवाक्य – It’s all in the Mind म्हणजेच कोणत्याही व्यक्तींच्या समस्यांचे मूळ मूख्यतः त्यांचे स्वतःचे विचार आहेत असे आहे.

जिल्हास्तरावर महाविदयालयीन विदयार्थी-विदयार्थीकरिता 25 जानेवारी 2023 सकाळी 10 वा. ला जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, भंडारा यांचे मार्गदर्शनाखाली रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीस मान्यवरांव्दारे हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात येईल. तसेच सकाळी 11 वा. शासकिय नर्सिंग स्कूल (हॉल), जिल्हा रुग्णालय, भंडारा येथे महाविदयालयीन विदयार्थी-विदयार्थी करिता रोल प्ले स्पर्धा- एचआयव्ही, एड्स बाबत समज – गैरसमज, कलंक व भेदभाव तसेच प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2017 या विषयावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना रोख रक्कम प्रमाणपत्र व पारितोषिक तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल.

दिनांक 12 ते 26 जानेवारी 2023 दरम्यान तालुका स्तरावरील आयसीटीसी समुपदेशक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांचेव्दारे महाविदयालयीन विदयार्थी-विदयार्थीनीकरिता एचआयव्हीएडस, क्षयरोग, एसटीआय, आरटीआय, ए. आर. टी औषधोपचार याविषयावर मार्गदर्शन तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेल आहे.