पशुसंवर्धन विभागाअंतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनासाठी अर्ज करण्याकरीता मुदतवाढ मिळाल्याबाबत

पशुसंवर्धन विभागाअंतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनासाठी

अर्ज करण्याकरीता मुदतवाढ मिळाल्याबाबत

 

गडचिरोली,दि.16: सन 2022-23 या वित्तीय वर्षात राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यासाठी दिनांक 14.01.2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी इच्छुक लाभार्थ्यांनी खाली नमुद केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, गडचिरोली डॉ. विलास गाडगे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि. प. गडचिरोली डॉ. सुरेश कुमरे यांनी केले आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ- http.//ah.mahabms.com, ॲड्रॉइंड मोबाईल अप्लिकेशनचे नाव- AH.MAHABMS(Google Play स्टोरवरील मोबाईल ॲपवर उपलब्ध), अर्ज करण्याचा कालावधी हा 13.12.2022 ते 14.01.2023 आहे., टोल फ्री क्रमांक- 1962 किंवा 1800-233-0418 असा आहे. असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, गडचिरोली डॉ. विलास अ. गाडगे यांनी कळविले आहे.