24 फेब्रुवारी रोजी मतदार जनजागृतीकरीता मॅरेथॉन रॅलीचे आयोजन Ø रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

24 फेब्रुवारी रोजी मतदार जनजागृतीकरीता मॅरेथॉन रॅलीचे आयोजन Ø रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

चंद्रपूर,दि.22 : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता SVEEP कार्यक्रमांतर्गत लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरीता 18 वर्षे पूर्ण व 18 वर्षावरील सर्व स्त्री-पुरुषाकरीता मॅरेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर मॅरेथॉन रॅलीचे घोषवाक्य “माझे मत माझा अधिकार”, “होय मी मतदान करणारच”, “आपण सगळे मतदान करूया” “लोकशाहीला बळकट करूया” या घोषवाक्यासह दि.24 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:15 वाजता चांदा क्लब ग्राउंड येथून सदर मॅरेथॉन रॅलीला सुरुवात होत आहे.

सदर रॅली चांदा क्लब पासून- पाण्याची टाकी- आझाद बगीचा चौक- गिरनार चौक- समाधी वार्ड- पठाणपुरा चौक ते परत गांधी चौक- छोटा बाजार- जटपुरा गेट- रामनगर ते परत चांदा क्लब येथे समाप्त होईल.

मतदार जनजागृती करीता सदर मॅरेथॉन रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रणजीत यादव यांनी केले आहे.