जाटलापूूर (तु.)जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतला मेळाव्याचा आनंद

जाटलापूूर (तु.)जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतला मेळाव्याचा आनंद

 

सिंदेवाही –जि.प.प्राथ.शाळा जाटलापूर (तु) येथे दि.!१३ जानेवारी २०२३ रोजी बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या आनंद सोहळ्याचा विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांनी आनंद घेतला.

आनंद मेळाव्यात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने खूप छान छान चविष्ट व चटकदार खाद्यपदार्थ बनवून आणले होते. स्टॉलची मांडणी, विविध पदार्थांची विक्री, खरेदी व विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी लुटला.

सकाळी मान्यवरांच्या हस्ते बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक श्री.वासुदेव पाटील बोरकर,कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.आम्रपाली ताई पोपटे अध्यक्षा शा.व्य.स. श्री.राऊत सर म.फुले विद्यालय ,मुख्याध्यापक श्री.जयंत लेंझे ,श्री.राजू जावळेकर,प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित होते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले.

विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण तणाव दूर करुन विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा या उद्देशाने दरवर्षी आनंद मेळाव्याचे आयोजन केले जाते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कु.बारस्कर, शिक्षिका गावातील सौ.मेघाताई वल्के, सौ.सपना देवगीरकर, सौ.योगिता चावरे, सौ.अल्का बोरकर, मारोती गोटेवार सर्व सदस्य शा.व्य.स.तसेच सौ.आशा बोरकर, सौ.सुचिता वल्के श्रीमती पार्वताबाई वल्के ,तरण वर्ग अमीत रणदिवे ,रोशन बोरकर यांनी परिश्रम घेतले.