अनुसूचित जमातीच्या प्रवेशपात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

अनुसूचित जमातीच्या प्रवेशपात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

 

· इयत्ता पहिल्या वर्गात शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकीत निवासी शाळेत मिळणार प्रवेश

 

भंडारा, दि. 26 : सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकीत निवासी शाळेत प्रवेश देण्याकरिता शासनाची योजना आहे. या योजनेंतर्गत इयत्ता पहिली वर्गात शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकीत शाळेमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. त्याकरिता अनुसूचित जमातीचे (आदिवासी) प्रवेशपात्र विद्यार्थ्यांकडून प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा यांचे कार्यालयाकडून अर्ज मागविण्यात येत आहे. प्रवेशाकरिता 27 डिसेंबर पासून प्रवेश अर्ज निशुल्क वितरीत करण्यात येणार असून संपूर्ण भरलेले अर्ज 27 जानेवारी 2023 पर्यंत स्विकारले जाणार आहे.

 

विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा तसेच सक्षम अधिकारी (उपविभागीय अधिकारी महसूल) यांचेकडून प्राप्त दाखला जोडवा. सन 2022-23 या वर्षात पालकाचे सरासरी एकत्रित उत्पन्न एक लाख रुपयाचे आत असावे. इयत्ता 1 ली करिता विद्यार्थ्यांचे जन्म दाखला सोबत जोडावे. प्रवेश घेण्यापूर्वी पालकांना प्रवेशाबाबत संमती लिहून द्यावे लागेल. विद्यार्थ्याचे आधार कार्ड, पालकांचा रहिवासी दाखला, दारिद्र्य रेषेखाली असल्यास तसा दाखला, विधवा असल्यास तसा दाखला सोबत जोडावा.

 

प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, मुख्याध्यापक शासकीय आश्रम शाळा येथे अर्ज निशुल्क उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा.