कवी महादेव ढोणे सन्मानित

कवी महादेव ढोणे सन्मानित

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एसटी महामंडळाच्या चंद्रपूर विभागात चालक /वाहक म्हणून कार्यरत असलेले कवी श्री महादेव ढोणे सन्मानित

राजुरा : वर्धा येथे ९६वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिनांक ३ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधीत मोठ्या थाटामाटात संपन्न झाले.

विशेष बाब म्हणजे कवी महादेव ढोणे यांच्या गझल व कविता या दोन्ही काव्य प्रकारातील रचनांची निवड झाली होती.

या संमेलनात राजुरा आगारातील कवी, श्री महादेव ढोणे हे दि. ५ फेब्रुवारी रोजी कविवर्य सुरेश भट गझल कट्टा व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी आयोजकांनी निवड केलेली “एसटी माझी दयाळू फार आहे” हे शीर्षक असलेली एक वेगळा आशय आणि विषय असलेली गझल सादर करून उपस्थित रसिकांची मने जिंकली. तद्नंतर प्रा. देविदास सोटे कवी कट्टा व्यासपीठावर निमंत्रित कवी म्हणून उपस्थित होते त्यांनी “माझी कविता” हे शीर्षक असलेली सामाजिक कविता सादर करून उपस्थित रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळवली आहे. कविवर्य सुरेश भट्ट “गझल कट्टा” व प्रा.देविदास सोटे “कवी कट्टा” या दोनही मंचावर मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व सुंदर असे सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले. राजुरा येथील सहकारी अधिकारी, कर्मचारी बांधवांच्या वतीने व एसटी साहित्य रसिक समूहाच्या वतीने व तसेच गावाकडील मित्रमंडळी, नातेवाईक यांनी सुद्धा श्री महादेव ढोणे यांचे विशेष अभिनंदन केले आहे