मालमत्ता व पाणी करात सुट मिळण्यास अवघे काही दिवस शिल्लक….

मालमत्ता व पाणी करात सुट मिळण्यास अवघे काही दिवस शिल्लक….

३१ ऑक्टोबरपर्यंत लाभ घेण्याचे मनपाचे आवाहन

 

चंद्रपूर १८ डिसेंबर – चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वसुली सुरु असून कर भरणा करतांना नागरीकांना लाभ व्हावा या दृष्टीने ३१ डिसेंबरपर्यंत मालमत्ता कराचा एकमुस्त भरणा केल्यास चालू आर्थिक वर्षासाठी मालमत्ता व पाणी करात ५% सुट देण्यात येणार आहे. परंतु सदर सुट ही औद्योगीक मालमत्तेस लागु राहणार नाही.

यापुर्वी सन २०२२-२३ मध्ये ज्या नागरीकांनी एकमुस्त चालु आर्थिक वर्षाचा मालमत्ता व इतर कराचा भरणा केला असल्यास अशा मालमत्ता धारकांनाही सुट देण्यात येईल, मात्र सदर सुटची रक्कम पुढील आर्थिक वर्ष सन २०२३-२४ मध्ये समायोजीत करण्यात येणार आहे.

शहरातील मालमत्ता धारकांनी थकीत कराचा भरणा करावा यासाठी महानगरपालिकेमार्फत सूट देण्यात असुन याअंतर्गत एकमुस्त भरणा केल्यास ०१/१२/२०२२ ते ३१/१२/२०२२ पर्यंत कराचा एकमुस्त भरणा केल्यास चालू आर्थिक वर्षासाठी ५ % सुट देण्यात येणार आहे.

एकुण मालमत्ता करत सदर सुट देण्यात येत असल्याने मालमत्ता कर त्वरित भरण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

कराचा भरणा झोन कार्यालये तसेच https://www.cmcchandrapur.com या वेबसाईटवर ऑनलाईन सुद्धा करता येत आहे.