सिंदेवाही पंचायत समितीतर्फे डॉ . बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली..

सिंदेवाही पंचायत समितीतर्फे डॉ . बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली..

महापरिनिर्वाणदिनी अभिवादन कार्यक्रम 

सिंदेवाही – पंचायत समिती सिंदेवाहीच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार ,आधुनिक भारताचे जनक व स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री भारतरत्न डॉ .बाबासाहेब उर्फ भीमराव रामजी आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समिती सभागृह सिंदेवाही येथे नुकतेच करण्यात आले .

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संवर्ग विकास अधिकारी अक्षय शुक्रे होते. तर अतिथी पशुधन विकास अधिकारी डा .विनोद सुरपाम उपस्थित होते .याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते महामानव डा .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मेणबत्ती प्रज्वलन व माल्यार्पणाने आदरांजली अर्पण करण्यात आली .

यावेळी गटविकास अधिकारी शुक्रे यांनी डा .बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय संविधानाच्या माध्यमातूम एससी .एसटी .,ओबीसी व महिलांचे अधिकार या क्षेत्रात दिलेल्या महत्पूर्ण योगदानावर उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले .

या कार्यक्रमाचे प्रास्तावीक शिक्षणतज्ञ् प्रा .भारत मेश्राम यांनी केले .तर संचालन व आभार मनोज अलोणे यांनी मानले .या कार्यक्रमाला पंचायत समितीचे सर्व

अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .या कार्यक्रमाची सांगता डॉ .बाबासाहेब आंबेडकर ,छत्रपती शिवराय व बिरसा मुंडा यांच्या जयघोषाने करण्यात आली .