ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग व तृत्तीयपंथी यांची कार्यशाळा संपन्न

ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग व तृत्तीयपंथी यांची कार्यशाळा संपन्न

चंद्रपूर, दि.5 : समाजकल्याण विभागामार्फत 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2022 कालावधीत संविधान समता पर्व अंतर्गत रोज विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. त्याअंतर्गत 3 डिसेंबर रोजी सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरीक, तृत्तीयपंथी, दिव्यांग यांची कार्यशाळा व बक्षिस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यशाळेला अध्यक्ष म्हणुन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, ज्येष्ठ नागरीक हेल्पलाईनचे व्यवस्थापक कपील राऊत, दिव्यांग कौशल्य विकास सोसायटीचे व्यवस्थापक निलेश पाझारे, संबोधन ट्रस्टचे अध्यक्ष राज काचोरे, तृत्तीयपंथी कुमकुम बॅनर्जी, सामाजिक कार्यकत्या सरीता मालु, दिव्यांग कार्यकर्ता सचिन हेडाऊ हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी ज्येष्ठ नागरीक, तृत्तीयपंथीय, दिव्यांग यांच्यासाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती देवून मार्गदर्शन केले. तसेच 10 वी व 12 वी वर्गामध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या अंकिता बागाटे, मिलन बांबोडे, सानिया देवगडे, तुषार इंदोरकर, मयुर बुरेवार या विद्यार्थ्यांना मान्यावरांचे हस्ते राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण निरीक्षक मनोज माकोडे यांनी केले. कार्यक्रमाला समाज कल्याण कार्यालयाचे दिनेश कोडापे, श्री. बन्सोड, श्री. सिडाम, श्री. बोरकर, श्री. सोनुले, श्रीमती ठाकरे, श्रीमती मुंडे, हुजैफा शेख, श्रीमती करमनकर, राबिया अली, कु.लोणकर, श्री.आकुलवार, श्री.कांबळे श्री.रायपुरे व इतर कर्मचारी तसेच वसतीगृहातील विद्यार्थी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.