आधारभूत किंमत धान खरेदी खरीप हंगाम 2022-23 अंतर्गत शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ

आधारभूत किंमत धान खरेदी खरीप हंगाम 2022-23 अंतर्गत शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ

भंडारा, दि. 2 : शेतकऱ्यांना आधारभूत किंमत धान खरेदी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात गेल्या हंगामाच्या तुलनेत अजुनही 30 हजार शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झालेली नाही. आधारभूत किंमत धान खरेदी योजना खरीप हंगाम 2022-23 मध्ये शासनाने शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी 7 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. तरी शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या खरेदी केंद्रावर 7/12 उतारा, आधार कार्ड, बॅक पासबुकची झेरॉक्स प्रत या कागदपत्रासह मुदतीआधी जाऊन नावाची नोंद करावी, असे आवाहन पणन विभागाने केले आहे.