चंद्रपूर महानगरपालिकेत संविधान दिन साजरा

चंद्रपूर महानगरपालिकेत संविधान दिन साजरा

 

चंद्रपूर २६ नोव्हेंबर – भारतीय संविधानाबाबत जनजागृती आणि सर्व नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी याकरिता महानगरपालिका चंद्रपुर च्या वतीने दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ ला सकाळी ११:०० वाजता आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून संविधान दिन साजरा करण्यात आला.

संविधान दिवसाच्या शुभेच्छा देतांना आयुक्त म्हणाले की, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना स्वातंत्र्य प्राप्त करून देण्याच्या अनुषंगाने दिनांक २६ नोव्हेंबर १९५० रोजी भारताची स्वतंत्र घटना अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण केलेली आहे. सर्वांनी संविधानाचा सन्मान करावा. असे मनोगत व्यक्त केले. संविधान दिनानिमित्त चंद्रपूर शहर महानगरपालिकेत भारताचे संविधान उद्देशिकेचे वाचन करून शपथ घेण्यात आली.

याप्रसंगी उपायुक्त अशोक गराटे,शहर अभियंता महेश बारई, सहायक आयुक्त सचिन माकोडे,राहुल पंचबुद्धे,डॉ. अमोल शेळके,विकास दानव,संतोष गर्गेलवार, गुरुदास नवले, प्रदीप पाटील, सिद्दिक अहमद तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संविधान उद्देशिकेचे वाचन उपायुक्त अशोक गराटे यांनी केले.