एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजने अंतर्गत शेतकऱ्यांकडून अर्ज आमंत्रित

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजने अंतर्गत शेतकऱ्यांकडून अर्ज आमंत्रित

 

भंडारा, दि. 25: एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना सन 2022-23 अंतर्गत जिल्ह्याचा वार्षिक कृति आराखडा मंजूर झाला आहे. या योजनेत सुटी फुले, पॅक हाऊस, हळद लागवड, मिरची लागवड, प्लास्टिक मल्चिंग, ड्रॅगन फ्रुट लागवड, हरितगृह व शेडनेट हाऊस उभारणी, सामुहिक शेततळे व ट्रॅक्टर करिता शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

 

लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शेतकरी योजना हा पर्याय निवडून शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावे. प्राप्त अर्जांची ऑनलाईन लॉटरी, पुर्वसंमती देणे, मोका तपासणी तसेच लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इत्यादी प्रक्रिया ऑनलाईन होणार असल्याने योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी त्वरीत अर्ज सादर करावे. अधिक माहिती करिता तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. अर्जना कडू यांनी कळविले आहे.