भंडारा : निवृत्तीवेतन व कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना सूचना

निवृत्तीवेतन व कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना सूचना

भंडारा, दि.11:- निवृत्तीवेतन व कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना सूचित करण्यात येते की, सिंडिकेट बँक ही कॅनरा बँकेत विलीन झाल्यामुळे बँकेचे आय.एफ.सी कोड 1 जुलै 2021 आणि 1 ऑगस्ट 2021 असे दोन वेळा बदललेले आहे. त्यामुळे ज्या निवृत्तीवेतन व कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांचे खाते सिंडीकेट बँक भंडारा येथे आहे. त्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचे निवृत्तीवेतन 2 सप्टेंबर 2021 पर्यंत उशिरा होणार आहे. असे जिल्हा कोषागार अधिकारी शंकर बळी यांनी कळविले आहे.