खालीस्तानाची मागणी करणारे तसेच प्रोक्ष-अप्रोक्ष त्या करीता मजबूर करणाऱ्या देशद्रोह्यांना क्षमा नाही :– धुन्नाजी

खालीस्तानाची मागणी करणारे तसेच प्रोक्ष-अप्रोक्ष त्या करीता मजबूर करणाऱ्या देशद्रोह्यांना क्षमा नाही :– धुन्नाजी

चंद्रपूर

आज काही स्वार्थी संधीसाधु व विशेषत विदेशात बसून खालीस्तानच्या नावानी आपली पोळी शेकणाऱ्यांनी सिख धर्म ज्यांना समजलाच नाही ते महाभाग सिक्खांचे खरे कैवारी म्हणून धार्मीक चिन्ह धारण करून श्री गुरूग्रंथ साहेबांचा हितोपदेश बाजुला सारून हिंदुस्थानातील काही इतर धर्म अंधानी सुध्दा खालीस्तान सिक्खांची मागणी असे दर्शविण्याचा व त्यांच्याबद्दल तेढ निर्माण करण्याचा प्रयत्नही प्रोक्ष-अप्रोक्ष रूपाने चालवीला असून ज्या निधर्मीय देशाचा फार मोठा इतिहास आहे. ज्या देशात बलाढ्य, शक्तीमान योद्धे, महापुरूषांनी राष्ट्राच्या एकता व अखंडतेकरीता तसेच राष्ट्राच्या जडणघडणीकरीता मोलाची कामगीरी केली, देशाकरीता आपल्या प्राणाची आहुती दिली ते कोणत्याही एका धर्म जातीचे नव्हते व आपण आज जातीवाद, प्रांतवाद, भाषावादाच्या नावाखाली तर कुठे धर्माच्या नावाने देशाला खंडीत करण्याच्या प्रयत्नांना आपल्यातच असलेली काही मंडळी हातभार लावत आहे. असे चित्र समोर येत असून आम्हा भारतात राहणाऱ्या सर्व भारतीयांना अश्या विघातक शक्तीपासून सावध राहून आपल्या-आपल्या धर्मातील सुउपदेश, एकता व एकात्मतेकरीता ते उपदेश सर्वांच्या समोर आनण्याची गरज आहे.

श्री गुरूनानक ज्यांच्या 553 वा प्रकाश पर्व आपण सर्वांनी साजरा केला त्या गुरूजींनी म्हटले आहे “मानस की जात एक हे समझो” तर त्यापुढे जाऊन नानकजी म्हणतात, “ना मैं हिंदु, ना मुसलमान, पाच तत् का पुतला नानक मेरा नाम” गुरूवाणीमध्ये राम बोलो, रामा बोला, राम बिना क्या बोले रें, एवढेच नाही तर “अल्लाह, वाहेगुरु, हरी का नाम एक है, झुठे वहमो मे पडी है दुनीया” चा संदेश देणारे ज्या गुरुग्रंथ साहेबांत संत नामदेव, कबीर, रविदास, सेनानाई, धन्नाजाट अशा कितीतरी संतांचे श्लोक शिवाय हिंदी, उर्दु, पारसी, अरबी, मराठी भाषा आहे. त्या मानवतावादी धर्माच्या नावाने लोकांची दिशाभुल करून खालीस्तानची मागणी करणारे सिख धर्माचे अनुयायी होवूचं शकत नाही. मात्र त्यांच्या या उपक्रमाला उचलून धरणारे व त्याचा अधिक उवापोह करणारे आपल्याच हिंदुस्तानातील काही महाभाग आहेत हे नाकारता येत नाही.

सिक्ख गुरूंनी मनुवाद व मनुवाध्यांकडून होणारे अत्याचार, औरंगजेब व बाबर सारख्या राज्यां कडून हिंदुना मुसलमान बनविण्यासाठी चालविलेल्या अन्यायकारी धोरणाचा विरोध करण्याकरीता श्री गुरु तेगबहादुरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. श्री गुरु गोविंदसिंह त्यांचे चारही पुत्रांनी हिंदु धर्म रक्षणार्थ अन्यायाचा प्रतिकार करण्याकरीता, जोर जबरीने धर्म परिवर्तनाचा विरोध करीत, आपल्या प्राणांची आहुती दिली. म्हणूनच म्हटल्या गेले आहे “सर्व वंशदानी” गुरु गोविंदसिंह. तर श्री गुरूतेगबहादूर यांना “हिंद कि चादर” म्हणून संबोधल्या गेले आहे. असे असतांना संपूर्ण भारतच आमचे घर असतांना देशाच्या स्वातंत्र्य लढयापासुनच नव्हे तर 1857 पासून देशाच्या रक्षणार्थ वेळोवेळी प्राणांची आहुती देणाऱ्या शुरविरांच्या देशात खालीस्तानाची भाषा बोलणाऱ्यांना खरे गुरूचे अनुयायी क्षमा करणार नाही. जर वेगळे राष्ट्रच करायचे असते तर, गुरुगोविंदसिंहानी इतर राजा महाराजांप्रमाणे आपले राज्य स्थापून त्याचे विस्तारीकरण केले असते. पण त्यांनी देश, धर्म, गौ, गरीब, अबलांची अब्रु वाचविणेकरीता लढा दिला. कुणी कुणावर अत्याचार करून धर्मांतर करण्यास भाग पाडू नये या सर्व बाबींसाठीच खालसा पंताची स्थापना केली. जर खालीस्तान हिच त्यांची परिकल्पणा राहिली असती तर त्यांनी त्यावेळीच आपले राज्य निर्माण केले असते. आम्ही श्री गुरुग्रंथ साहेबातील मानवता, एकता, भाईचारा हे मुळ उद्देश विसरून खालीस्तानच्या नावानी काही मुठभर बाहेर देशातील व आपल्या देशातील जातीवादी शक्तींना बळी पडून त्यांच्या आहारी जात असू तर, हे सिक्ख धर्माच्या मुळ उपदेशाच्या विपरीत होईल. ते सहनही केल्या जाणार नाही. तसेच या निधर्मीय लोकशाही राष्ट्रात धर्मांध शक्तींना तत्व व उद्देश यात तसेच इतिहासात खोडसळपणा करणाऱ्यांना सहन केल्या जाणार नाही.

हिंदुस्थानमध्ये पिढयान पिढयांपासून राहणाऱ्या सर्वांचा व सिक्खांचाही या देशावर पुर्ण अधिकार आहे. जर आम्हास शिक्षण, व्यापार, नौकरी तसेच प्रत्येक धर्माच्या पुजा अर्चनांमध्ये जर अडथळे आणण्याचा कुणीही एखाद्या विशेष धर्माच्या किंवा राष्ट्राच्या नावाने केलेला प्रयत्न सुध्दा खपवून घेतल्या जाणार नाही. भारताच्या संविधानाबद्दल आम्हास पूर्ण आस्था आहे. भगवतगीता जेथे वंदनीय आहे. तेथेच आम्ही तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेला राष्ट्राची एकता, एकात्मता चा मार्ग दर्शविणारा ग्रंथ म्हणून नमन करतोय. शेवटी आजच्या या पत्रकाच्या माध्यमाने आम्ही सर्व सिक्ख बंधुंना नम्र प्रार्थना करतो की, आपआपल्या धार्मीक स्थानी खालीस्तानाच्या मागणीचा निषेध करून हिंदुस्तानमध्ये शिखांचे पुर्ण अधिकार व धार्मीक पुजाविधीला तडा जाऊ देणार नाही व त्यात कुणी हस्तक्षेप केल्यास त्यासही त्याची जागा दाखविण्यासाठी “वाहेगुरुजी का खालसा, वाहेगुरुजी की फतेह” या घोषवाक्यास कायम राहू असे आवाहन जेष्ठ सामाजीक कार्येकर्ते, पत्रकार व दैनिक खालसा संदेशचे संपादक सत्तर वर्षीय सरदार हरविंदरसिंह धुन्नाजी यांनी राष्ट्राची एकता व अखंडता अधीक सुदृढ व्हावी याकरीता आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.