परिक्षा केंद्राच्या परिसरात कलम 144 लागु

परिक्षा केंद्राच्या परिसरात कलम 144 लागु

भंडारा दि. 15 : जिल्हा परिषद भंडारा (गट-क) अंतर्गत कनिष्ठ सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व औषध निर्माण अधिकारी या संवर्गाची ऑनलाईन परीक्षा दिनांक 18 ते 26 डिसेंबर 2023 या कालावधीत (प्रतिदिवस तीन सत्रामध्ये) भंडारा जिल्हयातील Late Ajay Pardhi, Memo. PVT. ITI Hasara Tumsar, Sairam PVT. ITI Bhandara या उपकेंद्रावर आयोजीत करण्यात आलेली आहे.

या परिक्षा केंद्रावरील परीक्षा शांततेच्या वातावरणात पार पडतील व तेथील परिक्षाथींना तणावमुक्त वातावरणात परीक्षा देणे शक्य होईल, म्हणून सदर परीक्षा केंद्रांच्या परिसरात 200 मीटर अंतरापर्यंत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी कलम 144 आदेश लागु केला आहे.

या परिसरात निषिध्द क्षेत्रात झेरॉक्स मशीन / फॅक्स व एस.टी.डी. बुथ परिक्षा कालावधीत सुरु राहणार नाही, परिक्षा केंद्रात व परिसरात मोबाईल फोन/ लॅपटॉप/ पेजर/ टेपरेकॉर्डर/ कॅमेरा इत्यादीचा वापर करता येणार नाही, निषिध्द क्षेत्रात नारेबाजी करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, भाषणे करणे, घोषणा करता येणार नाही, पाच पेक्षा जास्त इसम एकत्र येणार नाही, शस्त्र/ सोटे/ तलवारी/ भाले/ बंदुका/ सुरे/ लाठ्या किंवा काठया किंवा शारीरीक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर ठेवता येणार नाही, कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेता येणार नाही.