अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिका लाभार्थ्यांसाठी शिधावस्तुंचे वितरण

अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिका लाभार्थ्यांसाठी शिधावस्तुंचे वितरण

 

भंडारा, दि. 23: राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत व प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजना चे शासनाकडून नियतन प्राप्त झालेले आहे. रास्तभाव दुकानदारांना पुरवठा करून कार्यरत पात्र शिधापत्रिकाधारकांना तातडीने वितरण करण्याचे निर्देशित करण्यात आलेले आहे.

डिसेंबर 2022 मध्ये प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिका लाभार्थ्यांना प्रति व्यक्तीला 1 किलो गहु, 4 किलो तांदुळ व अंत्योदय प्रति शिधापत्रिका लाभार्थ्यांना 5 किलो गहु, 30 किलो तांदूळ व 1 किलो साखर शिधावस्तुचे वितरण उपलब्ध करण्यात येईल. डिसेंबर 2022 मध्ये प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिका व अंत्योदय लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 1 किलो गहु, 4 किलो तांदूळ शिधापत्रिका धारकाला शिधावस्तुचे वितरण उपलब्ध करण्यात येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी, भंडारा यांनी कळविले आहे.