चंद्रपूर : चिमूर विधानसभेतील समाजसेवक धनराजभाऊ मुंगले यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

चिमूर विधानसभेतील समाजसेवक  धनराजभाऊ मुंगले यांनी  काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  नानाभाऊ पटोले यांच्या मुंबई येथील निवासस्थानी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार मदत व पुनर्वसन मंत्री तसेच प्रकाशभाऊ देवतळे जिल्हाध्यक्ष चंद्रपूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न झाला.
यावेळी प्रमुख उपस्थित कार्यकर्ते यशवंत वाघे माजी सरपंच नेरी, विठ्ठल पाटील कोरेकर खडसंगी,  नानाभाऊ नंदनवार शिवसेना शहर प्रमुख, अनंताजी येळणे शंकरपुर,  प्रदीपजी तळवेकर चिमूर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते