नगरपंचायत सिंदेवाही-लोनवाही शहरात हिंसक प्राण्यांचा प्राणघातक हल्ला…

नगरपंचायत सिंदेवाही-लोनवाही शहरात हिंसक प्राण्यांचा प्राणघातक हल्ला…

सिंदेवाही नगरपंचायत शहरात भात गिरणि परिसरात मागील वर्षी वाघ आल्याने वनविभागाची झोप उडाली होती. तब्बल बारा तासांच्या मोठ्या कसरती नंतर वाघाला पिंजऱ्यात बंद करून जंगल परिसरात सोडण्यात आले होते. त्या घटनेनंतर पुन्हा बिबट वाघ, जंगली डुक्कर, हरीन अशें अनेक जंगली प्राणी सिंदेवाही शहरात वावर करतांना नागरीकांना आढळलेत.

पुन्हा आज सकाळी पाच वाजता महाकाली पेट्रोल पंप, विवेक नगर, पंचशील नगर, सार्वजनिक बांधकाम विभाग च्या रेस्ट हाऊस परिसरात दोन अस्वल नागरिकांना दिसून आल्याने लोक सैरावैरा पळू लागले एका अस्वलीने एका मानसावर प्राणघातक हल्ला केला परंतु त्याने आपला जीव कसाबसा वाचविला या प्रकरणामुळे पुन्हा शहरात भितिचे वातावरण निर्माण झाले आहे.

या सर्व प्रकाराला वनविभाचे अधिकारी जिम्मेदार आहेत कारण जंगली हिंसक प्राणी शहरात येणे हि पहिल्यांदा नसतांना वनविभाग थंडीच्या गार झोपेत आहेत.

सकाळी सहा वाजता शाळेचे विद्यार्थी शिकवणी वर्गात जात असतात,छोटे मुले रस्त्यावर खेळत असतात भविष्यात कसल्याही प्रकारची जिवित हाणी झाल्यास सिंदेवाही वनविभागाच्या अधिकाऱ्यांना किंमत मोजावी लागणार असा इशारा जखमी व घटनास्थळी उपस्थित लोकांनी दिला आहे.