भंडारा : डी. एल. एड. प्रथम वर्ष प्रवेशप्रक्रिया सुरू

डी. एल. एड. प्रथम वर्ष प्रवेशप्रक्रिया सुरू

भंडारा, दि. 11 : शैक्षणिक वर्ष 2021-2022 करिता प्राथमिक शिक्षण पदविका प्रथम (डी .एल. एड) प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.
यासाठी विद्यार्थ्यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेच्या  डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एमएए डॉट एसी डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे  आवाहन करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर प्रवेशाबाबतच्या सविस्तर सूचना, पडताळणी केंद्रांची यादी, प्रवेश नियमावली व अधिकृत व शासनमान्य अध्यापक विद्यालयांची यादी उपलब्ध आहे.
इयत्ता बारावी उत्तीर्ण असलेले विद्यार्थी ऑनलाईन अर्ज 9 ऑगस्ट 2021 पासून भरू शकतील.  खुल्या संवर्गासाठी 200 रूपये तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 100 रू. प्रवेश शुल्क आहे, असे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या डॉ. राधा अतकरी यांनी कळवले आहे.